About Mardani Khel

Welcome to Mardani Khel Association,

Thoughts,

 

मी, संजय बापूराव बनसोडे.

(संस्थापक / अध्यक्ष)

हौशी मर्दानी खेळ जागतिक महासंघ.

 

जगभरातील जवळपास १० ते १२ युध्द कलेचा अभ्यास केला आणि प्रत्यक्षात ते खेळून अनुभव घेतला म्हणून सांगतो भारतीय युध्द कला ही सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील पारंपरिक मर्दानी खेळ ही युध्द कला जगासमोर मांडण्याची संकल्पना सुचली आणि कार्यपूर्ती कडे वाटचाल सुरू झाली.

महाराष्ट्र, भारत येथील मर्दानी खेळाला शेकडो वर्षांचा पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्याची ही ओळख म्हणून जगभरात या खेळाची ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असूनही मुठभर मावळे, सवंगडी सोबत घेऊन याच युद्ध कलेचा वापर केला आणि गनिमी कावा (Gurilla War) च्या माध्यमातून जगात स्वतःचे राज्य स्थापन करणारे पहिले छत्रपती ठरले.

हे कार्य एवढे सहज सोप्पे नव्हते. लाखोंच्या संख्येने शत्रू आणि शिवाजी महाराजांचे मावळे फक्त शेकडोच्या संख्येत. कोणी स्वप्नात देखील विजयाची कल्पना करू शकणार नाही अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी आपल्या बौधिक क्षमतेचा आणि अतुलनीय युध्द कलेचा वापर करून साक्षात विजय प्राप्ती केली.

मला सांगायला अभिमान वाटतो की, शेकडो वर्षीच्या परंपरागत युध्द नीतीचा अभ्यास पूर्ण विचार करून जगभरात जर कोठे नवनवीन शस्त्रांची निर्मिती झाली ते ठिकाण म्हणजे भारत देशातील महाराष्ट्र हे होय. कारण मराठी मावळ्यांनी आहे त्या युध्द परिस्थिती ज्या अडचणी आल्या त्यावर अभ्यास करून विटा, नागीण, गुर्ज, वाघनख, बाणा अशा बऱ्याच नवीन शस्त्रांचा शोध नव्याने लावला आणि निर्मिती केली.

हौशी मर्दानी खेळ जागतिक महासंघ स्थापन करण्या मागचा उद्देश हाच आहे की एवढी अलौकिक कला जगामधून लुप्त होऊ नये. नवीन पिढीला ही एक कला म्हणून अवगत व्हावी आणि पुढे देखील ही युध्द कला जिवंत राहावी या प्रमुख उद्देशाने हौशी मर्दानी खेळ जागतिक महासंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

सबंध जगभरात हौशी मर्दानी खेळ जागतिक महासंघ या संघटनेच्या वतीने मर्दानी खेळांचा प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहेत.

इतर कोणत्याही खेळांच्या तुलनेत पारंपरिक मर्दानी खेळ तसूभरही कमी नाही. उत्कृष्ट दर्जाचे तंत्रज्ञान, शारिरीक चपळता, उत्तम दर्जाचे खेळाडू आणि जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती हे सर्व मर्दानी खेळाला लाभले आहे.

मर्दानी खेळांची विशिष्ट अशी नियमावली आहे. या नियमावलीच्या आधारे खेळाडूंना गुणांकन दिले जाते.

हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी संपूर्ण जगभरात आपली जागतिक संघटना प्रयत्नशील आहे.

 

चला एक होऊया आणि जगाला मर्दानी खेळ खेळवूया🌎🚩

Objectives of Mardani Khel Association

To make Mardani Khel a Global sport

Vision

Get Mardani Khel recognized as an official sport at National and International level.

Mission

To preserve and promote the traditional martial art form (of Mardani Khel) by training todays generation, and act as a common platform to connect experts and practitioners in this field across different geographies

0 %
Practitioner Satisfaction
0 +
Expert Instructors
1 0 +
Positive Review
0 +
Associated Teams

Our Team

Meet our expert team

Kiran Adagale

Chief Secretary

Sanjay Bansode

Chairman

Smita Dhiwar

Chief Treasurer

Our

Benefits

Physical well being
  • Increased strength
  • Increased Endurance
  • Sharpened reflexes
  • Complements to the physical growth
Mental well being
  • Increased creativity
  • Self confidence building
  • Increased focus
  • Concentration
  • Increased mental agility
Organized and disciplined lifestyle
Previous
Next